‘राज्यपाल हा केंद्र सरकारचा व राष्ट्रपतींचा एक राजकीय एजंट असतात. कारण ते पूर्णपणे राजकीय काम करतात. सध्या देशात फक्त दोनच राज्यांत राज्यपाल आहेत. त्यातील एक महाराष्ट्रात व दुसरे पश्चिम बंगालमध्ये. कारण इथे विरोधकांची केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांची सरकारं आहेत,’ असा चिमटा संजय राऊत यांनी एएनआयशी बोलताना काढला.
राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून राज्यपाल कोश्यारी यांनी घेतलेल्या अनेक भूमिकांमुळं वाद निर्माण झाले आहेत. शपथविधीपासूनच याची सुरुवात झाली होती. कालांतरानं विधान परिषदेच्या निवडणुका, अंतिम वर्षांच्या परीक्षेच्या मुद्द्यावरून सरकार व राज्यपालांमध्ये सातत्यानं खटके उडत राहिले. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्रामुळं अलीकडेच नवा वाद निर्माण झाला होता. या पत्रातून राज्यपालांनी एखाद्या राजकीय नेत्याच्या थाटात मुख्यमंत्र्यांना सुनावलं होतं. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं होतं. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित राज्यपालांच्या पत्राबद्दल व त्यातील भाषेबद्दल चिंता व्यक्त केली होती. शिवसेनेनं ‘सामना’तूनही राज्यपालांवर जोरदार तोफ डागली होती. आज पुन्हा एकदा राऊत यांनी राज्यपाल व त्यांच्या निमित्तानं केंद्र सरकारला टोला हाणला.
आणखी वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times