या प्रकरणी शुभम रमणलाल भळगट (वय २४) याच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भळगट याला अटक करण्यात आली आहे. नगरमधील शेरकर गल्ली येथ शुभम भळगट याच्या घरी बेकायदा गुटखा विक्री होत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने काल, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला.
यावेळी शुभम भळगट याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्या घरी व गोदामात मोठ्या प्रमाणावर गुटखा सापडला. हा गुटख्याचा माल किती आहे, हे मोजण्याचे काम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या गुटख्याची अंदाजे किंमत १३ लाख ९२ हजार ७२९ रुपये असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भळगट याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक एस. एच. सूर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times