मुंबई: सुशांतसिंह राजपूत आत्महत्या व ड्रग्ज प्रकरणामुळं चर्चेत असलेलं बॉलिवूड आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय ठरलं आहे. बॉलिवूड मुंबईबाहेर हलविण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेनं केल्यानंतर आता माजी खासदार यांनी मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. (Nilesh Rane criticises )

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं होतं. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अनेक नटनट्यांची चौकशी झाली. त्यातून अद्याप फारसं काही हाती लागलेलं नसलं तरी बॉलिवूडची ती बाजू समोर आली. बॉलिवूडशी संबंधित काही मंडळींनी राजकीय वक्तव्ये करून एकमेकांची नावे घेतल्यानं हे प्रकरण खूपच गाजलं. सिनेसृष्टीतील मान्यवरांनी याबाबत चिंताही व्यक्त केली होती. मल्टिप्लेक्स व थिएटर मालकांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या संपूर्ण घडामोडींवर भाष्य केलं. ‘गेल्या काही दिवसांपासून ठराविक लोकांकडून बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत’, असा इशारा त्यांनी दिला होता.

वाचा:

याच अनुषंगानं नीलेश राणे यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘परतीच्या पावसामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॉलिवूडची खुषामत करताहेत. मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर लक्ष द्या,’ असा खोचक सल्लाही राणेंनी दिला आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार पर्यावरण मंत्री यांचे मित्र आहेत. त्यावरून याआधीही अनेक राणे कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे व आदित्य यांच्यावर टीका केली आहे. करोना काळात मुंबईत उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे टेंडर बॉलिवूडमधील मित्रांना विचारूनच दिले जातात, असा थेट आरोप आमदार नीतेश राणे यांनी केला होता.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here