या अपघताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या ३ बटालियनचे एक पथक बांदिपोरा जिल्ह्यातील काही भागात गस्त घालत होते. हे पथक नरसू भागात आले असता जिप्सीच्या चालकाचे संतुलन बिघडले आणि क्षणार्धात ही जिप्सी नाल्यात कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच जम्मू आणि काश्मीर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीआरपीएफच्या मदतीने जिप्सीमधील ४ जवानांना बाहेर काढले. चौघांनाही तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमी जवानांपैकी दोघांची स्थिती गंभीर
दुर्घटनाग्रस्त जिप्सीमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ४ जवानांपैकी एक जवान उपचारादरम्यान शहीद झाल्याचे जाहीर करण्यात आले. तीन जखमी जवानांमध्ये रवी राज, अंकितकुमार गुप्ता आणि विनोदकुमार यादव यांचा समावेश आहे. यांपैकी दोघांची स्थिती अत्यंत नाजुक आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
क्लिक करा आणि वाचा बातमी-
गस्ती पथकाची ही जिप्सी परिसरातील जवानाच्या तैनातीची पाहणी करत होती, त्यावेळी ही दुर्घटना घडल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
क्लिक करा आणि वाचा बातमी-क्लिक करा आणि वाचा बातमी-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times