नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता () तसंच त्याची मॅनेजर (Disha Salian) मृत्यू प्रकरणात खोट्या बातम्या () पसरवण्यासाठी एकाला अटक करण्यात आलीय. असलेल्या () याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वकील असल्याचा दावा करणाऱ्या विभोर आनंद याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं अटक केलीय.

विभोर आनंद याला अधिक चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आलंय. त्याचं ट्विटर अकाऊंटदेखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या गाईडलाईन्सचं उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलंय.

सोशल मीडियावर अनेक सनसनाटी निर्माण करणारे तसंच अपमानजनक आरोप आणि खोटे दावे केल्याचा आरोप विभोर आनंद याच्यावर ठेवण्यात आलाय. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणात अनेक स्वरचित कहाण्या विभोरनं सोशल मीडियावरून शेअर करत अनेकांना आपल्या निशाण्यावर घेतल्याचंही पोलिसांच्या निदर्शनास आलंय. तयासाठी त्याच्यावर कायद्याच्या इतर कलमांसहीत ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वाचा :

वाचा :

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात बोलताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ‘मीडियामध्ये जाणून बुजून काही कहाण्या तयार करून त्या खऱ्या असल्याचा दावा करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी हे प्रकरण अतिशय वाईट पद्धतीनं हाताळल्याचं दाखवून देणाऱ्या या कहाण्यांमुळे मुंबई पोलिसांनना अपमान सहन करावा लागला. परंतु, आपल्या तपासाबाबत आश्वस्त होते’ असंही सिंह यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं होतं.

याच्याशीच संबंधित मुंबई पोलिसांनी एका मॉडेल आणि यू-ट्युबरलाही गेल्या महिन्यात अटक केली होती. महिलांविरुद्ध अपमानजनक कंटेन्ट तयार करून प्रसारित करण्यासाठी, एका महिलेच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली होती. पत्रकार असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीनं पोलिसांच्या चौकशीत तो पत्रकार नसल्याचं कबूल केलं. केवळ यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर आपले फॉलोवर्स वाढवण्यासाठी आपण व्हिडिओ तयार करून ते प्रसिद्ध केल्याचंही या पठ्ठ्यानं कबुली दिली होती.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here