मुंबई: महाराष्ट्रातील अनेक भागांवर आणि पुराचे संकट कोसळले आहे. राज्यात आतापर्यंत ४८ जणांचा या संकटाने बळी घेतला असून पिकांची अतोनात हानी झाली आहे. ही स्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान यांनी आज मुख्यमंत्री यांच्याशी फोनवरून संपर्क साधून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. ( Calls CM )

मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांना टॅग करून मराठीत ट्वीट केले आहे. ‘महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मी पुन्हा एकदा दिले’, असे पंतप्रधानांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने महाराष्ट्रात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८ जण बेपत्ता आहेत. या भागात घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून हातातोंडाशी आलेली पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. शेतकरी हवालदील झाला आहे. या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच केली आहे. दुसरीकडे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रावर कोसळलेलं पूरसंकट पाहता केंद्राने भरीव मदत करावी, अशी मागणी केली आहे. या घडामोडी सुरू असताना पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना केलेला फोन महत्त्वाचा ठरला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिल्याने राज्याला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रावर कोसळलेल्या या आपत्तीच्या अनुषंगाने केंद्राकडून भरीव मदत मिळण्याची आशा आता निर्माण झाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक येथील विभागीय आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली व जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा. तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना देतानाच अन्य आवश्यक सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here