दुबई: मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सवर (केकेआर) दणदणीत विजय मिळवला. या विजासह मुंबई इंडियन्सच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पण दुसरीकडे पराभूत झालेल्या केकेआरचे गुणतालिकेत नेमके झाले तरी काय,

या सामन्यापूर्वी मुंबईच्या संघाने सात सामने खेळले होते. या सात लढतींमध्ये मुंबईच्या संघाला पाच विजय मिळवता आले होते. त्याचबरोबर त्यांना दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ हा दुसऱ्या स्थानावर होता. पण आजच्या सामन्यात मुंबईच्या संघाने केकेआरवर आठ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे मुंबईच्या संघाने दोन गुण मिळवले आहेत. या दोन गुणांसह मुंबईच्या संघाचे १२ गुण झाले आहेत. गुणतालिकेत मुंबईसह दिल्लीच्या संघाचेही समान १२ गुण आहेत. पण मुंबईचा रनरेट चांगला असल्यामुळे त्यांनी अव्वल स्थानाला गवसणी घातली आहे.

या सामन्यापूर्वी केकेआरचा संघ सात सामने खेळेला होता. या सात सामन्यांमध्ये केकेआरने चार विजय मिळवले होते, तर त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आठ गुण केकेआरच्या संघाने पटकावले होते. या सामन्यात केकेआरच्या संघाला मुंबईकडून मोठा पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर केकेआरचे चार विजय आणि चार पराभव झाले आहेत. त्यामुळे या सामन्यानंतर केकेआरचा संघ चौथ्याच स्थानावर आहे. कारण चौथ्या स्थानानंतर असलेल्या एकाही संघाला आठ गुणांची कमाई करता आलेली नाही. त्यामुळे या पराभवानंतर केकेआरचा संघ चौथ्या स्थानावर आहे.

मुंबईने गुणतालिकेत आता पहिले स्थान पटकावले आहे. दिल्लीच्या संघाची आता दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ आहे, तर चौथ्या स्थानावर केकेआरचा संघ आहे. गुणतालिकेत पाचवे स्थान सनरायझर्स हैदराबादने पटकावले आहे, तर सहाव्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ आहे. गुणतालिकेत सातव्या स्थानावर राजस्थान रॉयल्स आणि आठव्या स्थानावर किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here