नवी दिल्ली:
पाकिस्तानचे पंतप्रधान यांना शांघाय सहकार्य संघटना (एससीओ परिषदेत) सहभागी होण्यासाठी भारतात येण्याचे आमंत्रण दिले जाणार आहे. या परिषदेचं यजमानपद भारताकडे आहे. इम्रान खान यांना आमंत्रित केलं जाणार का असा प्रश्न माध्यमांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत विचारला. तेव्हा ‘सर्व आठ देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रण दिले जाणर,’ असं मंत्रालयाने सांगितलं.

चीनद्वारे UNSC मध्ये बंद दाराआड काश्मीर मुद्द्यावर अनौपचारिक चर्चेवरही परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार म्हणाले, ‘या व्यासपीठाचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न पाकिस्तानद्वारे UNSC सदस्यत्वाद्वारे केला गेला होता. UNSC च्या बहुतांश सदस्यांना वाटत होतं, की अशा प्रकारच्या मुद्द्यांवरील चर्चेसाठी UNSC हे योग्य व्यासपीठ नाही, या मुद्द्यांवर द्विपक्षी चर्चा व्हायला हवी.’

रवीश कुमार म्हणाले, ‘आता हे स्पष्ट आहे की भारत यावर्षाच्या अखेरीस एससीओ परिषदेच्या प्रमुखांच्या परिषदेचं यजमानपद भूषवेल. ही बैठक पंतप्रधानांच्या स्तरावर दरवर्षी आयोजित केली जाते आणि यात एससीओचे कार्यक्रम आणि बहुपक्षीय आर्थिक आणि व्यापारी धोरणावर चर्चा केली जाते.’ एससीओच्या आठ सदस्य देशांमध्ये भारतासह चीन, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, रशिया, पाकिस्तान, तझाकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान २०१७ पासून सदस्याच्या रुपात एससीओमध्ये समाविष्ट झाले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here