वाचा:
पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून राजेंद्र वाल्मिकी आणि त्याच्या सहा साथीदारांनी एका टेम्पो चालकाकडून पैसे उकळले. गुटख्याची वाहतूक केल्याच्या संशयावरून वाल्मिकी आणि त्याच्या साथीदारांनी या चालकाला लुटल्याचे तपासातून पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयाने या सर्व आरोपींची प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली.
वाचा:
दरम्यान, जामिनासाठी पैसे नसल्याने मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती करण्यासाठी वाल्मिकी आणि साथीदार शुक्रवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने मुदतवाढ न दिल्यास अटक होईल या भितीने वाल्मिकी याने शिवडी येथील न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत वाल्मिकी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times