श्रीनगर : जम्मू – काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणेसमोर दहशतवाद मोडीत काढण्याचं मोठं आव्हान आहे. यासाठी भारतीय सेनेकडून वेगवेगळ्या मोहिमाही राबवल्या जात आहेत. नागरिकांना आणि सुरक्षा यंत्रणेला हानी पोहचवणाऱ्या दहशतवाद्यांना टिपण्याबरोबरच रस्ता भटकून दहशतवादाच्या मार्गावर पोहचलेल्या तरुणांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांना देण्याचाही प्रयत्न सेनेकडून केला जातोय. दहशतवाद्यांना मारण्याऐवजी त्यांनी शरणागती पत्करावी यासाठी सेनेकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नात सेनेचे जवान आपल्या जीवावर उदार होऊन दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. अशाच एका प्रयत्नाचा व्हिडिओ समोर आलाय. शुक्रवारी बडगामच्या चंडुरा भागातील या व्हिडिओनं अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय.

सुरक्षा दलानं एन्काऊन्टरनंतर अत्यंत प्रेमानं एका दहशतवाद्याला शरणागतीसाठी प्रोत्साहीत केलं. ‘कुणीही ठार करणार नाही… फक्त हत्यार टाकून दे’ असा विश्वास देत या तरुण दहशतवाद्याला शरणागती पत्करल्यानंतर पाणी देऊन शांत करण्यात आलं. सुरक्षा दलाचा हा प्रयत्न यशस्वी ठरला.

वाचा :

वाचा :

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ चंडुरा भागातील आहे. या भागातील एका घरात दोन दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षादलाच्या हाती लागली होती. या दहशतवाद्यांत पोलिसांचा पळपुटा एसपीओ अल्ताफ हुसैन याचाही समावेश होता. यानंतर पोलिसांनी सेनेच्या ६६ आरआर आणि सीआरपीएफची एक टीम सोबत घेऊन सर्च ऑपरेशन सुरू केलं. या दरम्यान त्यांची दहशतवाद्यांसोबत चकमकही झाली.

चकमकीदरम्यान अल्ताफ हुसैन पळून जाण्यात यशस्वी ठरला, मात्र त्याच्यासोबतच्या दहशतवाद्याला सुरक्षा दलानं थेट ठार न करता शरणागतीची संधी दिली. या दहशतवाद्याचं नाव जहांगीर अहमद असल्याचं समजतंय. जहांगीर हा चंडुराचाच रहिवासी आहे. त्याच्याकडून एके ४७ रायफल जप्त करण्यात आलीय.

जम्मू-काश्मीरमध्ये मार्ग भटकून हातात बंदूक घेतलेल्या तरुणांना मुख्य धारेत परत आणण्यासाठी सुरक्षा दलाकडून एक धोरण आखलं जातंय. भारतीय सेनेनं यासाठी ‘रिहॅबिपलिटेशन पॉलिसी’चा ड्राफ्टही तयार केलाय. हा मसुदा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय. या धोरणानंतर काही सकारात्मक बदलांची आशा सेनेला आहे.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here