म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे प्रकार सुरूच आहेत. सोशल मिडीयावर वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिल्लीतील वकिलास मुंबई पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. असे या वकिलाचे नाव आहे.

सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सॅलियन यांच्या मृत्यूप्रकरणात विभोर आनंद यांनी बनावट कथा रचून ती सोशल मीडियावर पसरवली होती. या कथेमध्ये या प्रकरणाशी संबंध नसलेल्यांनाही गोवण्यात आले होते. कोणतेही पुरावे नसताना अनेकांची नावे घेत त्यांची बदनामी करण्यात येत होती. विशेष म्हणजे आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली होती. दिशा सॅलियनचा ८ जून रोजी आणि सुशांतसिंग राजपूतचा १४ जून रोजी मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांचा संबंध जोडून अफवा पसरवल्या जात आहेत. मुंबई पोलिसांचा सायबर विभाग अशा लोकांवर लक्ष ठेवून आहे. खोटे, बदनामीकारक काही पसरवू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here