श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग येथील लारनू भागात शनिवारी सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षादलादरम्यान सुरू आहे. या चकमकीत एक झाल्याचे वृत्त आहे. पोलिस आणि संयुक्तपणे हे अभियान राबवत आहेत.

काल, शुक्रवारी देखील बडगाम येथे सुरक्षादले आणि दहशतवाद्यांध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत दोन ते तीन दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी घेरले होते. मिळालेल्या माहितीनुसार ही चकमक बजगाम जिल्ह्यातील नागम चाडूरा परिसरात झाली होती.

या पूर्वी बुधवारी सुरक्षादलांनी शोपियानमध्ये अभियान चालवत दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआरपीएफ आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवली होती. त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.

हिवाळा आल्यामुळे आता दहशतवाद्यांनी आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. मात्र, सुरक्षादले पूर्णपणे सतर्क असून ती आक्रमकपणे दहशतवाद्यांविरोधात मोहिमा राबवत आहेत. याच महिन्यात शोपियान, बडगाम, श्रीनगर, कुलगामसह इतर भागांमध्ये सुरक्षादलानी अभियान चालवून अनेक दहशतवाद्यांना ठार केले आहे.

दहशतवादी आला शरण

काल चंडुरा भागात एक दहशतवादी सुरक्षादलांना शरण आला. या भागातील एका घरात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाच्या हाती लागली होती. यानंतर पोलिसांनी सेनेच्या ६६ आरआर आणि सीआरपीएफच्या एका पथकासोबत शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान त्यांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली.

क्लिक करा आणि वाचा-

ही चकमक सरू असताना एक दहशतादी अल्ताफ हुसैन पळून जाण्यात यशस्वी ठरला. तर त्याच्यासोबत असलेल्या एका दहशतवाद्याला सुरक्षा दलानं थेट ठार न करता शरणागतीची संधी दिली. या दहशतवाद्याचं नाव जहांगीर अहमद असं आहे. जहांगीर चंडुराचा रहिवासी आहे. त्याच्याकडून एके ४७ रायफल जप्त करण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here