मुंबईः मुख्यमंत्री यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा, त्यामुळं लोकांना मोठा दिलासा मिळेल, असा सल्ला वंचित आघाडीचे नेते यांनी दिला आहे.

आठ दिवस कोसळलेल्या परतीच्या पावसानं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांना कोंब आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही होत आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्याची मागणी केली आहे, तसा व्हिडिओही त्यांनी ट्विट केला आहे.

‘वादळी पावसाने महाराष्ट्राच्या अनेक भागांत प्रचंड नुकसान केलं आहे. अनेक वस्त्यांमध्ये पाणी गेलं आहे. शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकांना दिलासा देण्यासाठी या भागाचा दौरा करावा व आपत्ती व्यवस्थापनासोबक बैठक घेऊन लोकांना काय मदत देणार हे जाहीर करावं,’ असंही ते म्हणाले आहेत.

शरद पवारांचा दोन दिवसीय दौरा

शरद पवार १८ ते १९ ऑक्टोबर या दोन दिवसांत मराठवाड्यातील तुळजापूर, उमरगा, औसा, परंडा, उस्मानाबादमधील भागांना भेट देणार असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. तर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून बारामतीतील पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here