वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाशी दोन हात करत असलेल्या जगासाठी चांगली बातमी समोर आली आहे. करोनाला अटकाव करणाऱ्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करणाऱ्या फायजर कंपनीने मोठी माहिती दिली आहे. पुढील महिन्यात फायजर कंपनी लशीच्या आपात्कालीन वापरासाठी अर्ज करणार आहे. यामुळे सर्वाधिक करोनाबाधित असलेल्या अमेरिकेला दिलासा मिळणार आहे.

फायजर कंपनीच्या या माहितीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. ट्रम्प यांनी करोनावरील लस मतदानापूर्वीच येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला लशीबाबतच्या मंजुरीसाठी वेगाने हालचाली करण्याास सांगितले होते. राजकीय फायद्यासाठी ट्रम्प असा निर्णय घेत असल्याची टीका त्यांच्यावर झाली.

वाचा:
नोव्हेंबर अखेर लस?

फायजरने विकसित केलेल्या लशीची चाचणी सुरू आहे. या चाचणीची माहिती, निष्कर्ष समोर येण्याची प्रतिक्षा केली जात आहे. लस कितपत प्रभावी आहे, त्याची सुरक्षिता किती आहे, याची माहिती मिळाल्यानंतर लशीचे उत्पादन वाढवता येऊ शकते. या लस चाचणीचे परिणाम सकारात्मक आल्यानंतर फायजर कंपनी आपली भागिदार असलेली जर्मन कंपनी BioNTech SE सोबत नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लस मंजुरीसाठी अर्ज करणार आहे. इतर देशांमध्ये कधी अर्ज करणार याबाबत मात्र कंपनीने काहीही स्पष्ट केले नाही. डिसेंबरमध्ये लस उपलब्ध होणार असल्याचे याआधीच कंपनीने स्पष्ट केले होते. फायजर विकसित करत असलेली लस mRNA आधारीत लस आहे. लशीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीत अॅण्टीबॉडी आणि टी-सेल निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.

वाचा:
वाचा: अनेक देशात चाचणी

या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. अमेरिकेशिवाय ब्राझीस, अर्जेंटिना आणि जर्मनीत ३० हजारजणांवर लस चाचणी करण्यात येत आहे. लस चाचणी यशस्वी झाल्यास डिसेंबर २०२० अखेरपर्यंत १० कोटी लस डोस वितरीत करण्यासाठी अमेरिकन सरकारसोबत दोन अब्ज डॉलरची डील करण्यात आली आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत १.३ अब्ज लस डोस वितरीत करण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here