लोखंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे आज लोकार्पण नगरमध्ये झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शिर्डीचे मंदिर उघडण्याबाबत आपली भूमिका काय? असे जेव्हा लोखंडे यांना विचारले असता ते म्हणाले, शिर्डीचे मंदिर चालू करावे, ही भूमिका माझी देखील आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्याच्या संदर्भात दक्षता म्हणून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्व राज्यात करोना संदर्भात परिस्थिती कमी होते. पण मंदिर चालू केल्यानंतर पुन्हा रोगराई होऊ नये, म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांनी ही दक्षता घेतली आहे. करोनाची संख्या कमी झाली तर लवकरात लवकर राज्यातील मंदिरे मुख्यमंत्री सुरू करतील, अशी आशा आहे,’ असेही ते म्हणाले.
‘मंदिरे उघडण्या संदर्भात केवळ एका मंदिराचा नाही, तर संपूर्ण राज्याचा विचार मुख्यमंत्री ठाकरे करीत आहेत. मात्र ज्या वेळी तिरुपती बालाजीचे मंदिर चालू केले, तेव्हा तेथील अनेक कर्मचारी बाधित झाले होते. शिर्डीत देखील करोन प्रादुर्भाव वाढत होता. आता शिर्डीत बधितांची संख्या कमी प्रमाणात होत असल्याने तेथील मंदिर चालू करण्याबाबत आम्ही मुख्यमंत्री यांना विनंती करणार आहोत,’ असेही लोखंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपच्या वतीने शिर्डी येथे नुकतेच मंदिर उघडण्याचे मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेच्या हिंदुत्वावर शंका घेतली होती. त्याबाबत लोखंडे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘शिवसेनेला हिंदुत्व चंद्रकांत पाटील यांनी सांगण्याची गरज नाही. हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. ते सर्वांना माहिती आहे. मात्र केवळ लोकांच्या आरोग्याचा विचार करून मुख्यमंत्री यांनी मंदिर बाबतचा निर्णय घेतलाय. त्यामध्ये राजकारण करू नये.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times