राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अय्यरला दुखापत झाली होती. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना अय्यरच्या खांद्याला जबर दुखापत झाली होती. त्यामुळेच अय्यरला त्यावेळी मैदान सोडाले लागले होते. त्यानंतर अय्यर मैदानात दिसलेला नाही. आज दिल्लीच्या संघाने अय्यरच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण जेव्हा अय्यरला दुखापत झाली होती, तेव्हा त्याला यामधून सारवण्यासाठी काही दिवस लागू शकतात, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार दिल्लीच्या आजच्या सामन्यात अय्यर खेळणार नाही, असेच चित्र दिसत आहे.
अय्यर जर खेळत नसेल तर दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद हे धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनकडे देण्यात येऊ शकते. कारण गेल्या सामन्यात जेव्हा अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हा धवननेच संघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे आज जर अय्यर खेळला नाही तर धवनकडे दिल्लीच्या संघाचे नेतृत्व देण्यात येऊ शकते. धवनला संघाचे नेतृत्व करताना यावेळी आर. अश्विनसह अनुभवी खेळाडूंची मदत होऊ शकते. यापूर्वी अश्विनही दुखापतग्रस्त झाला होता. पण आता तो पूर्णपणे फिट असल्याचे पाहायला मिळत आहे.
अय्यरच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत दिल्लीच्या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. गुणतालिकेत दिल्लीचा संघ हा पहिल्या दोन स्थानांमध्ये असतो, त्यानुसार दिल्लीच्या संघाची आतापर्यंतची कामगिरी आपण समजू शकतो. पण आजच्या सामन्यात अय्यर खेळणार नसेल तर धवन संघाचे नेतृत्व कसे करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. धवनकडे चांगला अनुभव आहे. पण आतापर्यंत त्याला कर्णधारपद देण्यात आले नव्हते. पण आता ही जबाबदारी धवन कशी पार पाडतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times