अमेरिकेत करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. करोनाच्या थैमानात निवडणूक पार पडत असून पोस्टल मतदानाचा पर्याय मतदारांना उपलब्ध करून दिला आहे. आयोवा, विस्कॉन्सिनशिवाय मिशिगन, मिनेसोट, पेन्सिल्वेनिया, ओहायो या राज्यांमध्ये वाढला आहे. करोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विस्कॉन्सिन राज्यात मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित आढळले. राज्यपाल टोनी इवांस यांनी सांगितले की, मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे विस्कॉन्सिन नॅशनल गार्डस् तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांची काळजी घेत काही राज्यांमध्ये प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काही राज्यांनी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. आयोवा आणि विस्कॉन्सिन सारख्या राज्यात निवडणूक अधिकारी मतदान केंद्र वेळे आधीच सुरू करत आहेत. त्याशिवाय मतदारांनाही लांब रांगांमध्ये उभे राहण्याच्या तयारीत येण्यास सांगितले जात आहे.
वाचा:
आयोवामध्ये स्कॉट काउंटी ऑडिटर रोक्सना मोरित्ज यांनी डेव्हनपोर्ट आणि जवळच्या परिसरात मतदानाच्या दिवशी अतिरिक्त मतदान केंद्र सुरू केले आहेत. मतदान केंद्रावर लोकांची गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
वाचा:
वाचा:
अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या ८२ लाखांवर पोहचली आहे. तर, दोन लाथ २३ हजारजणांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, ५३ लाख बाधितांनी आजारावर मात केली आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत करोनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाच्या मुद्यावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न डेमोक्रॅटीक पक्षाकडून करण्यात येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times