पाटणा: बिहार निवडणूक () प्रचाराला बिहारच्या दौऱ्यावर गेलेले केंद्रीय मंत्री () यांच्या हेलिकॉप्टरचे पंखे पाटणा विमानतळाजवळ तारांना अडकून तुटले. मात्र, हा अपघात होण्यापूर्वीच केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे या हेलिकॉप्टरमधून उतरले होते. पाटणा विमानतळाच्या स्टेट हँगरजवळ ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केंद्रीय मंत्री सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताबाबत कोणतीही अफवा पसरू नये यासाठी रविशंकर प्रसाद यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे. अपघाताची कोणतीही घटना घडली नसून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद सुरक्षित असल्याचे त्याच्या कर्यालयाकडून सांगण्यात येत आहे.

रविशंकर प्रसाद यांच्या कार्यालयातून देण्यात आलेले स्पष्टीकरण-

एअरपोर्ट अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार, रविशंकर प्रसाद यांच्यासोबत बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय आणि जलसंधारण मंत्री संजय झा हे देखील हेलिकॉप्टरमध्ये होते. या तिन्ही नेत्यांचे हे एअरपोर्टच्या कामासाठी लावण्यात आलेल्या एसवेस्टसच्या वर लावलेल्या तारांना धडकले. यामुळे हेलिकॉप्टरचे पंखे तुटले. मात्र, या अपघाता अगोदर हेलिकॉप्टरमधील सर्व मंत्री उतरलेले होते.

क्लिक करा आणि वाचा बातमी-
रविशंकर प्रसाद हे सर्व निवडणूक प्रचारसभा आटोपून परतल्यानंतर हा अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये असलेले सर्वजण सुरक्षित आहेत.

क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here