वाचा:
आई-वडील घरी नसताना बारा वर्षीय भाऊ व नऊ वर्षीय बहिणीमध्ये टीव्ही पाहण्यावरून वाद झाला. यावेळी भावाने त्याच्या बहिणीच्या डोक्यात लोखंडी हातोडी घातली. त्यामध्ये बहिण गंभीर जखमी झाली. तिला जखमी स्थितीत सोडतच तिच्या भावाने घरामधील लॅपटॉप व पैसे घेऊन येथील एक हॉटेल गाठले व त्याने मला घरच्यांनी मारहाण केली असून तुमच्या हॉटेलमध्ये नोकरी द्या, असे हॉटेलच्या व्यवस्थापकाला सांगितले. त्यावेळी हॉटेलच्या व्यवस्थापकाने मुलाच्या पालकांना फोन केला. त्यानंतर मुलाचे पालक तातडीने घरी पोहचले असता त्यांना त्यांची मुलगी बाथरूम मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तसेच या मुलीचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
वाचा:
दरम्यान, बहिणीच्या डोक्यात हातोडी घालणाऱ्या संबंधित अल्पवयीन मुलाला केडगाव बायपास येथील हॉटेल वरून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times