नवी दिल्लीः तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी अलिकडेच चीनच्या नापाक मनसुब्यांचा पर्दाफाश केला. यावरून चीनचा संताप झाला आहे. आता या मुद्द्यावरून चीनने भारताला धमकी दिली आहे. भारताने सीमावादाच्या चर्चेत तैवानचा मुद्दा उपस्थित केला तर कारवाई केली जाईल, अशी धमकी चीनने भारताला दिली आहे.

हिंदी महासागरातून होणारी वाहतूक भारतासाठी जोखीमीची ठरेल इशारा भारत आणि तैवानच्या वाढत्या जवळीकवरून चिनी तज्ञांनी दिला आहे. चीनच्या ग्लोबल टाईम्सने हे वृत्त दिलं आहे. सीमावादाच्या चर्चेदरम्यान भारताने तैवानचा मुद्दा उपस्थित केला तर कारवाई करू, अशी धमकीही चीनने दिली आहे. त्याच वेळी, भारतातील चीनच्या दुतावासाने “तैवान स्वातंत्र्य” मुद्द्यावर भारतीय माध्यमांनी तैवानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या मुखलाखतीचाही चिनी दूतावासाने निषेध केला होता.

तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांच्या मुलाखतीमुळे भारत चीनसंबंधी एका सिद्धांचे गंभीरपणे उल्लंघन करण्यासाठी भाग पडलं. जे तैवान मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन भूमिकेच्या उलट आहे. चीनच्या सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी संबंधित मूलभूत हितसंबंधांच्या मुद्द्यांवर संबंधित भारतीय माध्यमांनी योग्य ते भूमिका घ्यावी असा आमचा आग्रह आहे. त्यांनी तैवान स्वातंत्र्यच्या मुद्द्याला व्यासपीठ उपलब्ध करून देऊ नये आणि जनतेत चुकीचा संदेश पाठवणं टाळावं, असं भारतातील चिनी दुतावासाकडून सांगण्यात आलं.

तिबेटप्रमाणेच चीन तैवानवरही कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. पण आपण स्वतंत्र देश आहोत हा संदेश तैवान जगाला देत आला आहे. यासाठी तैवानच्या अध्यक्षांनी आणि इतर नेत्यांनी अनेकदा भारताचे कौतुक केले आहे आणि पाठिंबा मागितला आहे. यातूनच तैवानने चीनची पोलखोल केलीय. चीन आपल्या आर्थिक घडीचा उपयोग करून इतर देशांवर कब्जा करत असल्याचा आरोप तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी यांनी केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here