मुंबई- चिमणा-चिमणी हे खरं तर आपल्या बालपणीचे सखे. पण, महानगरी मुंबईमधील सिमेंट-काँक्रिटच्या जंगलात, वाढत्या कोलाहलात हे आपले मित्र हरवत चालले आहेत. हे पक्षी आता केवळ आठवणीत राहतात की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. ज्येष्ठ अभिनेते यांना एका चिमणीनं असंच भावूक केल्याचं दिसतंय. शुक्रवारी त्यांनी ट्वीट केलेला हा फोटो दिवसभर चर्चेत होता.

सर्वसामान्यपणे कोणताही पक्षी माणसाच्या जवळ जात नाही. त्यात चिमणी माणसाची सावली दिसली तरीही उडून जाते. पण नाना यांच्या हातावर बसलेली चिमणीला नवी मित्र भेटला असावा अशी अलगद बसली आहे. तिने नानांवर विश्वास ठेवला. या फोटोला नानांनी ‘मित्र’ एवढंचं कॅप्शन दिलं. सध्या सोशल मीडियावर अनेक फॅनपेजवरून हा फोटो व्हायरल होत आहे.

नाना यांनी सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबासोबत घालवला वेळ
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी नाना पाटेकर दोन दिवसांसाठी मोकामा, बिहार येथील सीआरपीएफ ट्रेनिंग सेन्टरमध्ये गेले होते. यानंतर ते पटणातील राजीव नगर येथील सुशांतसिंह राजपूतच्या घरी गेले आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.

भावुक दिसले नाना पाटेकर

या दुःखाच्या क्षणी सुशांतच्या घरच्यांकडे आपली संवेदना व्यक्त करताना नानाही फार भावुक झाले होते. नाना यांनी सुशांतच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. यासोबतच ते बराच वेळ सुशांतच्या वडिलांशी बोलत होते. यावेळी दोघांचेही चेहरे फार उदास होते.

मीडियाशी साधला नाही संवाद
सुशांतच्या घरच्यांना भेटून झाल्यानंतर नाना सरळ विमानतळाकडे रवाना झाले होते. यादरम्यान त्यांनी मीडियाशी संवाद साधला नाही. मोकाट येथील सीआरपीएफ जवानांच्या ट्रेनिंग सेन्टरला त्यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती करण्याकडे भर द्यावा असं आवाहनंही केलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here