2020, शारजा: दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सवर पाच विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. दिल्लीने यावेळी सामन्यात चेन्नईवर मात केली, तर गुणतालिकेत त्यांनी मुंबई इंडियन्सला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीच्या विजयानंतर गुणतालिकेत नेमके काय बदल झाले आहेत,

दिल्लीच्या संघाने या सामन्यापूर्वी आठ सामने खेळले होते. या आठ सामन्यांमध्ये दिल्लीने सहा लढतींमध्ये विजय मिळवला होता, तर त्यांना दोन पराभव पत्करावे लागले होते. पण आजच्या सामन्यात दिल्लीने चेन्नईच्या संघावर मात केली. त्यामुळे दिल्लीने आता दोन गुण कमावले आहेत. या दोन गुणांसह दिल्लीचे १४ गुण झाले आहेत. या आयपीएलमध्ये सर्वप्रथम १४ गुण कमावण्याचा मान दिल्लीच्या संघाने पटकावला आहे. दिल्लीच्या संघाने १४ गुणांसह गुणतालिकेत मुंबईच्या संघाला धक्का देत अव्वल स्थान पटकावले आहे.

या सामन्यापूर्वी चेन्नईच्या संघाने आठ सामने खेळले होते. या आठ सामन्यांमध्ये त्यांनी तीन विजय मिळवले होते, तर पाच लढतींमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आजच्या लढतीत चेन्नईला दिल्लीकडून पराभूत व्हावे लागले. आता चेन्नईच्या नावावर ९ सामने असून त्यांचे सहा गुण आहेत. त्याचबरोबर हा त्यांचा सहावा पराभव होता. गुणतालिकेतही ते सहाव्या स्थानावर होते आणि पराभवानंतरही त्यांनी आपले हे स्थान कायम ठेवले आहे.

सध्याच्या घडीला गुणतालिकेत दिल्लीने अव्वल स्थान पटकावले आहे, तर मुंबईचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ यावेळी १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेतील चौथे स्थान केकेआरने कायम ठेवले आहे. गुणतालिकेत पाचव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद असून सहावे स्थान चेन्नईच्या संघाकडे कायम आहे. सातव्या स्थानावर राजस्थान रॉयल्स आणि आठव्या स्थानावर किंग्स इलेव्हन पंजाब हे संघ आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here