नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वेळोवेळी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी बंगालच्या परिस्थितीविषयी मोठं विधान केलं आहे. पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे आणि सरकारचं याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यात विरोधी पक्षाचे नेते मारले जात आहेत आणि लोकशाहीची हत्या केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये लागू करण्याची भाजप नेत्यांची मागणी चुकीची नाहीए, असंही अमित शहा म्हणाले.

पश्चिम बंगाल सरकारला घेरलं

अमित शहा यांनी एका टीव्ही वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. पश्चिम बंगालमध्ये अम्फान वादळ आले. पण तिथे कोणतीही चांगली व्यवस्था केली गेली नव्हती. बजेट घोटाळ्यांमध्ये गेला. केंद्र सरकारकडून जे धान्य पाठवलं गेलं त्यातही घोटाळे झाले. करोनासाठी ज्या प्रकारची व्यवस्था केली गेली पाहिजे होती तीदेखील झाली नाही, असा आरोप अमित शहांनी केला.

राज्यात कायदा व सुव्यवस्था विस्कळीत झाली आहे. बॉम्ब बनवण्याचे कारखाने प्रत्येक जिल्ह्यात आहेत. सर्वात चिंता म्हणजे लोकशाहीत विरोधी पक्षनेत्यांची हत्या केली जात आहे. भारताच्या इतर कोणत्याही राज्यात असं घडत नाही. यापूर्वी अशा घटना केरळमधून समोर यायच्या. पण आता तिथेही तसं घडत नाही. यावेळी पश्चिम बंगालमध्ये बदल होईल आणि भाजपचे सरकार येईल, असं अमित शहा म्हणाले.

‘राष्ट्रपती राजवटीची मागणी चुकीची नाही’

पश्चिम बंगालमधील भाजप नेते सतत राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी करत आहेत. या बद्दल तुमचं काय मत आहे? असा प्रश्न मुलाखती दरम्यान शहांना केला गेला. जे राजकीय पक्ष तिथे काम करत आहेत, त्यांची मागणी परिस्थितीनुसार योग्य आहे. तेथील परिस्थिती पाहिल्यास त्यांची मागणी योग्य आहे, असं उत्तर अमित शहांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here