सोलापूर: ‘महाराष्ट्रात कलम ३६५ अर्थात लागू करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. महाराष्ट्रात ३६५ चा वापर करणे एवढे सोपे नाही. बहुमत असल्यानंतर कोणीही लगेच सरकार पाडू शकत नाही. त्यामुळे उगाचच अनावश्यक चर्चा करू नये’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री यांनी विरोधकांना फटकारले. ( Reacts On Demand )

वाचा:

अजित पवार सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. अतिवृष्टी व पूरबाधित भागांची ते पाहाणी करत आहेत. सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. सोलापूर जिल्ह्याचा वर्षाचा निम्मा पाऊस एकाच वेळी पडला आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. तर उद्या शरद पवार हे उस्मानाबादला जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. एकूण १८ लोक मृत्यूमुखी पडले. अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे. त्या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी पोल उभे करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. लोक म्हणतात की राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. पण अजून तशी परिस्थिती नाही. फळबाग आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

वाचा:

केंद्राची भरीव मदत लागणार

पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत पण या संकटात केंद्राची भरीव मदत लागणार आहे. केंद्रीय पथकाने यावे आणि राज्यातील पूरग्रस्त भागाचा सर्व्हे करावा. त्यामुळे नुकसानीचा अंदाज येईल, असे अजित पवार यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री स्वतः येवून जी काही मदत द्यायची असेल ती जाहीर करतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.

वाचा:

जलयुक्त शिवारची चौकशी कोणत्याही आकासातून नाही!

अजित पवार यांनी पंढरपूर येथे कुंभार घाटावर झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना जलयुक्त शिवारची चौकशी कोणत्याही आकासातून होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस सरकारच्या प्रकरणाची चौकशी कॅगने ताशेरे मारल्यावर सुरू झाली आहे. आता ही संस्था कोणाची हे पहा. यात घोटाळा झाल्याचे ताशेरे ओढले म्हणून मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि इतके हजार कोटी खर्च झाल्याने ओपन चौकशी व्हावी अशा मागणीतून निर्णय घेतला गेला, असे त्यांनी स्पष्ट केले. सिंचन प्रकरणावर ईडीने दिलेल्या नोटीस बाबत अजित पवार यांनी बोलणे टाळले. केंद्राच्या वेगवेगळ्या एजन्सीकडून चौकशी सुरू असून काल याबाबत तारीख होती ती पुढची मागून घेतली आहे आणि न्यायप्रविष्ट प्रकरणात मी भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याची आर्थिक स्थिती करोनामुळे खूप अवघड झाली असताना केंद्राकडून अद्याप ‘ जीएसटी ‘चे ६० हजार कोटी मिळालेले नाहीत. राज्याकडे कररूपाने येणारी रक्कम गोळा होत नसल्याने राज्याच्या ऐपती एवढे कर्ज काढून ६ महिने राज्याचा गाडा ओढल्याचेही पवार यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here