नवी दिल्ली: प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (LAC) शांतता आणि सौहार्दाला मोठा झटका बसला आहे. यामुळेच भारत-चीनमधील संपूर्ण संबंधांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ( external affairs minister) शनिवारी म्हणाले. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या ताणावाच्या पार्श्वभूमीवर केलं आहे. लडाखमध्ये सीमेवर दोन्ही देशांचे ५० हजार सैनिक तैनात आहेत.

जयशंकर यांनी आपल्या ‘द इंडिया वे’ या पुस्तकावर आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये, गेल्या तीन दशकांत दोन्ही शेजारी देशांमधील संबंधांच्या विकासाच्या ऐतिहासिक दृष्टीकोनात म्हटले आहे,

चीन-भारत सीमेचा प्रश्न हा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि कठीण विषय आहे. सध्या भारत-चीन संबंध ‘अत्यंत कठीण’ स्थितीतून जात आहेत. १९८० च्या दशकापासून दोन्ही देशांमधील संबंध सुधारले होते. सीमेवरील शांततेच्या आधारावर व्यापार, प्रवास, पर्यटन आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हे संबंध सामान्य होते, असं एस. जयशंकर यांनी ‘द इंडिया’ या आपल्या पुस्तकावर आधारीत वेबिनारमध्ये सांगितलं.

भारत चीन सीमावाद हा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि कठीण विषय आहे. वेगवेगळ्या स्तरांवर बर्‍याच चर्चा झाल्या आहेत. एखाद्या संबंधांमध्ये ही अतिशय उच्च स्तरावरील चर्चा आहे, असं जयशंकर म्हणाले.

एलएसीच्या सीमाभागात शांतता प्रस्थापित केली पाहिजे आणि १९८० च्या उत्तरार्धापासून अशी स्थिती राहिली आहे. पण सीमेवरील तणावाच्या स्थितीमुळे शांतता आणि सौहार्दाला झटका बसला आहे. साहजिकच यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर विपरित परिणाम होईल आणि तो दिसूनही येत आहे, असं जयशंकर यांनी सांगितलं.

जागतिक शक्ती म्हणून भारत आणि चीन उदयास येत आहेत आणि ते जगात आणखी ‘मोठी’ भूमिका स्वीकारत आहेत. पण दोन्ही देश एकच स्थान कसे काय साध्य करू शकतात हा ‘मोठा प्रश्न’ आहे, असं एस. जयशंकर म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here