नगर: आपल्या कीर्तनांमुळे आणि अलीकडे कोर्ट प्रकरणामुळे चर्चेत असलेले कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर (देशमुख) महाराज शनिवारी येथे निघालेल्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ‘मी येतोय, तुम्हीही या’ असे आवाहन ते सोशल मीडियातून करत होते. त्यामुळे मोर्चात त्यांचा पुढाकार असल्याचा अंदाज बांधला जात होता. प्रत्यक्षात मात्र, मोर्चानंतरच्या सभेत ते स्टेजवर न बसता खाली आंदोलकांच्या गर्दीत बसले. भाषण न करता मध्येच निघून गेले. नेहमीप्रमाणे अन्य राजकारण्यांनीच सभा ‘गाजविली’. ( in )

वाचा:

आणि इतर मागण्यांसाठी शनिवारी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातून जोरदार प्रचार मोहीम सुरू होती. त्यातील एक पोस्ट इंदुरीकरांच्या नावाने आणि फोटोसह असल्याने लक्षवेधक ठरली होती. त्यातच काही दिवस आधी प्रवरानगर येथे आलेले माजी मुख्यमंत्री यांच्याशी स्टेजवर जाऊन कानगोष्टी करताना दिसले होते.

वाचा:

इंदुरीकरांनी मोर्चासंबंधी आवाहन केले होते की, ‘सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते, सर्व समाजातील नेते, विविध संस्थांचे आजी -माजी पदाधिकारी, बंधू व भगिनींना जाहीर आवाहन करतो की, हा मोर्चा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नसून मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. आजपर्यंत मराठा समाजाने सर्व जाती धर्माचा मोठ्या भावा प्रमाणे आदर केला आहे. त्यामुळे सर्व समाजातील नागरिकांनी पाठींबा देण्यासाठी या मोर्चासाठी यावे.’ त्यानुसार शनिवारी मोर्चा झाला. तालुक्यातील सर्व प्रमुख नेते मंडळी यात सहभागी झाली होती. इंदुरीकरही यात सहभागी झाले. मात्र मोर्चाचे सभेत रूपांतर झाले, तेव्हा मात्र ते प्रेक्षकांच्या गर्दीत दाटीवाटीत जाऊन बसले. त्यांना स्टेजवर बोलविण्यात आले, तरीही ते गेले नाहीत. राजकारण्यांची भाषणे लांबत गेली आणि सभा लांबत असल्याचे पाहून इंदुरीकर महाराज भाषण न करताच निघून गेले.

वाचा:

यावेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. माजी मंत्री मधुकर पिचड, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे, मधुकर नवले, शिवाजी धुमाळ, अशोक भांगरे, भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, काँग्रेसचे बाळासाहेब नाईकवाडी, शिवसेनेचे महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ आदींची भाषणे झाली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here