लखनऊः हाथरसमधील तरुणीवरील ( )कथित सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी तपासाठी एसआयटी स्थापन केली आहे. या निर्णयाचे केंद्रीय गृहमंत्री ( ) यांनी शनिवारी समर्थन केलं. हाथरस प्रकरणी गैरसमज हे सरकारी स्तरावर नव्हे तर पोलिस स्टेशन स्तरावर होते, असं शहा यांनी सांगितलं. शहा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. शहा यांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. पोलिस स्टेशन सांभाळलं जात नाही, अशा सरकारला सत्तेत राहण्याचा काय अधिकार आहे? असा प्रश्न युपी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी केला.

पोलिस सुधारणा ही काळाची गरज आहे. पण बलात्काराच्या घटना एकाच वेळी राजस्थान आणि हाथरसमध्ये झाल्या. पण केवळ हाथरसचे प्रकरण का उचलले गेले? अशा भयंकर गुन्ह्यावर राजकारण करणं कितपत योग्य आहे? हाथरसच्या तीन आरोपींना त्याच दिवशी अटक करण्यात आली होती आणि अजूनही तुरूंगात आहेत, असं अमित शहा म्हणाले.

पोलिसांनी रातोरात पीडित तरुणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. आता या प्रकरणी एसआयटीकडून तपास करण्यात येत आहे. काही अधिका्यांना निलंबितही करण्यात आलं आहे. आता संपूर्ण तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. अशा विषयांवर कुणीही राजकारण करू नये, असं आवाहन अमित शहा यांनी केलं.

याप्रकरणी कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात सरकारची कुठलीही भूमिका नाही. ‘पोलिस स्टेशन स्तरावर’ सरकार सहभागी नाही. स्थानिक पातळीवर काही अधिकारी आहेत आणि योगी आदित्यनाथ यांनी एसआयटी बनवून योग्य निर्णय घेतला. एसआयटी या प्रकरणाची सखोल चौकशी करेल आणि अहवाल सादर करेल. या आधारावर कडक कारवाई केली जाईल, असं अमित शहा म्हणाले.

युपी कॉंग्रेस अध्यक्षांचा सवाल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर युपी कॉंग्रेसचे प्रदेशाध्य अजय कुमार लल्लू यांनी ट्वीट सवाल उपस्थित केला आहे. ‘गृहमंत्री अमित शहाजी. ज्यांना पोलिस स्टेशन सांभाळता येत नाही, अशा सरकारला सत्तेत राहण्याचा काय अधिकार आहे? हाथरस पीडितेवर मध्यरात्री अंत्यसंस्कार करणं किती योग आहे? या प्रकरणी तपास पूर्ण होण्यापूर्वी या घटनेत सामूहिक बलात्कार झाला नसल्याचं दावा अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि भाजप प्रवक्ते, नेते करत आहेत. हे योग्य आहे का? जिल्हाधिकाऱ्यांनी हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबाला धमकावणं योग्य होतं का? हाथरसच्या घटनेने भाजप सरकारचा महिला आणि दलितविरोधी चेहरा उघड झाला आहे, अशी टीका अजय कुमार लल्लू यांनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

52 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here