जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करावेत. कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘अतिवृष्टीमुळे काही घरांची अंशत: अथवा पूर्णत: पडझड झाली आहे. त्यांचे पंचनामेही तात्काळ करावेत. मयत व्यक्ती व मृत जनावरे याबाबत मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. सामान्य वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खचलेले रस्ते, पूल याबाबत लहान स्वरूपाची कामे आहेत त्याची तात्काळ दुरूस्ती सुरू करावी. विमा कंपन्यानी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शेतकऱ्यांना मदत करावी. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, आदी उपस्थित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times