: एमएमआरडीएतर्फे मेट्रो ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) आणि मेट्रो २ ए (डीएन नगर ते दहिसर) या प्रकल्प मार्गांलगत उच्च दाबाच्या विद्युतवहनाच्या पारंपरिक मनोऱ्यांऐवजी प्रथमच उभारण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही मार्गांलगत जवळपास पाच किमी अंतरावर एकूण २३ मोनोपोल बसवण्यात आले आहेत. वाहतूककोंडी, सुरक्षा आणि सौंदर्यकरणाच्या दृष्टीने कमी जागा व्यापणारे हे मोनोपोल महत्त्वाची भूमिका बजावतील.
मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता, प्रामुख्याने दाटीवाटीच्या भागात सिंगल बॉडी टर्मिनेशन सर्किटची नावीन्यपूर्ण रचना निर्माण करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्युतपुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्यांसाठी जास्त जागा व्यापणाऱ्या मनोऱ्यांऐवजी तुलनेने कमी जागा व्यापणाऱ्या मोनोपोलचा पर्याय पुढे आला आहे. यामुळे मनोऱ्यांवर लटकणाऱ्या विद्युततारांमुळे दिसणारे विद्रुप चित्र यापुढे दिसणार नाही असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times