येथील रेवती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात सरकारी दुकांनाच्या वाटपावेळी एका ४६ वर्षीय व्यक्तीची केल्याप्रकरणात पोलिस उपमहानिरीक्षक सुभाषचंद्र दुबे यांनी फरारी आरोपींसाठी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे; तसेच, त्यांच्यावर (रासुका) आणि गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची घोषणाही पोलसांनी केली.
गुरुवारी झालेल्या घटनेत आठ आरोपींची नावे देण्यात आली असून, यातील प्रमुख आरोपी आणि स्थानिक भाजप नेता याच्यासह सहा जणांचा पोलिस शोध घेत आहेत; तर, दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आणखी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आठ आरोपींव्यतिरिक्त ‘एफआयआर’मध्ये २० ते २५ अज्ञात आरोपींचा उल्लेख आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी १२ पथके स्थापन केली आहेत. दरम्यान, प्रमुख आरोपी धीरेंद्रने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. या घटनेत आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीचाही मृत्यू झाला असून, सहा सदस्य जखमी झाले आहेत. सोशल मीडियावर शुक्रवारी रात्री व्हिडिओ प्रसारित करून आपण माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष असल्याचे त्याने म्हटले आहे. दुर्जनपूर गावात गुरुवारी सरकारी दुकानवाटपावेळी गोळी लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर अनेक लोक जखमी झाले होते.
वाचा :
वाचा :
भाजप नेत्याची हत्या
दुसरीकडे, येथे एका भाजप नेत्याच्या कथित हत्याप्रकरणात पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. भाजप नेता डी. के. गुप्ता यांच्या कथित हत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवल्यानंतर वीरेश तोमर आणि अन्य दोन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या लोकांचा आपापसात वाद सुरू होता. या संदर्भात फेसबुकवरही पोस्ट टाकण्यात आली होती, असे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. भाजप नेता गुप्ता शुक्रवारी रात्री आपल्या बाइकवरून येत असताना, तीन गुंडांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. यानंतर स्थानिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन केले होते.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times