सौरभ लहू उमरे (वय २०, रा. साईनगर, हिंगणे) व मयूर धनंजय चतुर (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत पोलिस कर्मचारी बालाजी पांढरे (वय २७) जखमी झाले. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी पांढरे शिवाजीनगर वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. शुक्रवारी दुपारी ते वीर चाफेकर चौकात मास्क न परिधान करणाऱ्यांवर कारवाई करत होते. त्या वेळी त्यांना दोघे जण दुचाकीवरून मास्क न घालता जात असलेले दिसले. त्यांनी दोघांना अडविण्याचा प्रयत्न केला. पण ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे बालाजी यांनी त्यांची दुचाकी अडवून, मास्कची पावती करण्यास सांगितले. त्यावर आरोपींनी उद्धट वर्तन करून शिवीगाळ केली; तसेच गाडीचा धक्का देऊन त्यांना खाली पडले व त्यांच्या पायावर गाडी घालून पसार होण्याचा प्रयत्न केला. नागरिक व पोलिसांनी दोघांना पकडले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times