म. टा. प्रतिनिधी, : सासऱ्याच्या घरासमोरच एका ट्रकने जावायाला चिरडल्याची घटना शनिवारी घडली. आजीनाथ जगन्नाथ राऊत (वय ३०, रा. आडगाव खुर्द, ता. फुलंब्री) असे मृताचे नाव आहे. अपघातात एका बैलाचाही मृत्यू झाला.

राऊत हे फुलंब्री-राजूर रस्त्यावरून जातेगाव परिसरातील सासरवाडीत गेले होते. ते शनिवारी रात्री आठच्या सुमारास दुचाकीवर गावाकडे जाण्यासाठी निघाले. तेव्हा सासऱ्याच्या घरासमोरच राजूरकडून-फुलंब्रीकडे जाणाऱ्या ट्रकने (एम. एच. २१ बी. एच.१११५) चिरडले. राऊत यांची दुचाकी ट्रकच्या समोरच्या चाकात अडकल्याने ते फरफटत गेले. त्यांच्या पायाला आणि हृदयाला जोराचा मार लागला. त्यानंतर ट्रकने रस्त्याच्या बैलालाही धडक दिली. यात बैलाचाही मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मुलाला भर चौकात लाथाबुक्क्यांनी मारहाण

: एका अल्पवयीन मुलाला भर चौकात चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार दिवसांपूर्वी हॉटेलध्ये झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून चौघांनी एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलास बळजबरीने कारमध्ये कोंबून रोशनगेट चौकात रस्त्यावर आडवे पाडून तुडविल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात अल्पवयीन मुलगा जागीच बेशुद्ध पडला. गंभीर अवस्थेत त्यास नागरिकांनी उपचारासाठी घाटीत दाखल केले. ही थरकाप उडवणारी घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. त्यानंतर शनिवारी जिन्सी ठाण्याचे सहायक फौजदार हेमंत सुपेकर यांनी घाटी रुग्णालयात जाऊन जखमी अल्पवयीन मुलाचा जबाब नोंदवला. त्यावरून आमेर चाऊस आणि अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार काळे हे करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here