म. टा. प्रतिनिधी, : रिक्षा प्रवासात वृद्धेच्या पर्समधील लाखोंच्या बांगड्या सहप्रवाशी असलेल्या दोन भामट्या महिलांनी हातोहात लांबविल्याची घटना संभाजी चौकात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चा गुन्हा दाखल झाला आहे.

रुख्मिनी नानाजी वाघ (वय ६९, रा. ओझर मिग ता. निफाड) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी (दि. १६) नातेवाइकांना भेटण्यासाठी त्या शहरात आल्या होत्या. सीबीएस ते संभाजी चौक अशा रिक्षा प्रवासात ही घटना घडली. सिडकोच्या दिशेने जाणाऱ्या ऑटोरिक्षातून प्रवास करीत असतांना सहप्रवाशी असलेल्या दोन महिलांनी त्यांच्या ताब्यातील पर्समधील सुमारे एक लाख रुपये किमतीच्या दोन बांगड्या हातोहात लांबविल्या. ही घटना नातेवाइकांच्या घरी पोहचल्यानंतर उघडकीस आली.

कारमधून बॅगची चोरी

पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लेदरची बॅग चोरून नेली. या बॅगमध्ये नऊ हजार रुपयांसह महत्त्वाची कागदपत्र होते. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन त्र्यंबकभाई वरू (रा. नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. नितीन वरू शुक्रवारी (दि.१६) शिंदे गावातील औद्योगीक वसाहतीत गेले होते. नील पॉलीमर्स या कंपनीसमोर त्यांनी कार (एमएच १५ जीएक्स ०१७९) पार्क केली असता ही घटना घडली.

टोळक्याकडून तरुणास मारहाण

आपल्याबद्दल वाईट बोलत असल्याच्या संशयातून तीन जणांनी एका तरुणास दगड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना कथडा भागातील भोई गल्लीत घडली. या घटनेत तरुण जखमी झाला असून, भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत बरोलीकर, ओम सासे आणि अभिषेक ठाकरे (रा. सर्व भोईगल्ली, कथडा) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी प्रदीप उल्हास राणोरे (वय २३, रा. भोईगल्ली) यांनी तक्रार दाखल केली आहे. राणोरे गुरुवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास जय अहिरे वडापाव वाले या दुकानासमोर मित्र किरण पोरे याच्या समवेत गप्पा मारत असतांना ही घटना घडली. समोर बसलेल्या बरोलीकर याने आपल्या बद्दल वाईट बोलत असल्याच्या संशयातून वाद घातला. यावेळी राणोरे याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांनी शिवीगाळ करीत डोक्यात दगड मारला तर उर्वरित दोघांनी लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत राणोरे जखमी झाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here