अजित पवार हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसानं झालेल्या पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यापूर्वी पत्रकारांनी त्यांच्याकडून खडसेंच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रश्न येताच अजित पवारांनी सरळ हात जोडले. मला याविषयी काहीच माहीत नाही. ज्याची गोष्टीची माहितीच नाही, त्याबद्दल मी तुम्हाला कसं काय सांगणार?,’ असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.
वाचा:
भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळं बाजूला फेकले गेलेले एकनाथ खडसे पक्षांतराच्या निर्णयाप्रत आले आहेत. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते भाजपला धक्का देतील, असंही बोललं जात होतं. मात्र, तसं काहीही झालं नाही. आता ते दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करतील, असं बोललं जात आहे. याच विषयी अजित पवारांना विचारण्यात आले होते. मात्र, त्यांनी हा प्रश्न खुबीने टाळला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खडसेंच्या सोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे व काही आमदार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र, त्यांची सून रक्षा खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. भाजपच्या राज्यकार्यकारिणीत पदाधिकारी आहेत. त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा यावर मंथन सुरू आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times