गोरखपूर: उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. येथील एका महिलेशी डॉक्टरने केबिनमध्ये अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. टॉन्सिलवर उपचार करण्यासाठी आलेल्या या महिलेला डॉक्टरने अजब सल्ला दिला. पतीसोबत ओरल सेक्स केल्यानंतर घसा दुखणार नाही. ओरल सेक्स येत नसेल तर मी शिकवतो, असेही तो डॉक्टर म्हणाला. महिलेने या प्रकारानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.

देवरिया येथील महिलेने तक्रारीत अनेक आरोप केले आहेत. १५ ऑक्टोबरला संध्याकाळी सासरे आणि नणंदेच्या सोबत बांसगाव येथे डॉक्टरकडे गेली होती. तिला टॉन्सिलचा त्रास होता. तिचा घसा दुखत होता. महिला डॉक्टरच्या केबिनमध्ये गेल्यानंतर तिने घसा दुखत असल्याचे सांगितले. पतीसोबत ओरल सेक्स केल्यानंतर घसा दुखणार नाही असे डॉक्टरने सांगितल्याचा आरोप महिलेने केला आहे. इतकंच नाही तर तुम्हाला जमत नसेल तर, मी शिकवतो असेही डॉक्टर म्हणाला. त्यानंतर तो डॉक्टर महिलेसमोर अश्लील चाळे करू लागला, असाही आरोप आहे.

डॉक्टरच्या या अश्लील कृत्यानंतर महिला केबिनमधून बाहेर पडली. डॉक्टरने तिची वैद्यकीय तपासणीही केली नाही. घशावर उपचार करण्याऐवजी त्याने हा सल्ला दिला, असा आरोप तिने केला आहे. महिलेचा पती बाहेरगावी नोकरी करतो. या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. पुढील कारवाई करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

आणखी बातम्या वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here