सांगली: ‘आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडले. घरात बसून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येत नाही. यासाठी बांधावर जावे लागते,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार यांनी मुख्यमंत्री यांना लगावला. याशिवाय राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या वयाचे तरी भान राखायला पाहिजे होते, असे मत व्यक्त केले. सांगली येथे रविवारी आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ( criticises )

वाचा:

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून राज्यातील स्थिती पाहावी, असे आम्ही अनेकदा बोललो. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या काळात तरी मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून शेतीची पाहणी करावी. आम्ही सातत्याने मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर अखेर मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत आहेत. आता त्यांनी स्वतःची जबाबदारी झटकून मदतीसाठी केंद्राकडे बोट दाखवू नये. राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राकडे रितसर मागणी केली आहे का? कागदावर नुकसानीचा तपशील नोंदवला आहे का? याबाबत अजून काहीच काम झालेले नाही.

वाचा:

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रोत्तराबाबत विचारले असता आमदार पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. यात त्यांची काहीच चूक झाली नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी पत्राला उत्तर देताना किमान राज्यपालांच्या वयाचे तरी भान राखायला पाहिजे होते. त्यांनी दिलेले उत्तर योग्य नाही.’ सांगली महापालिकेच्या स्थायी समिती आणि प्रभाग समितींच्या निवडींमध्ये चुरस वाढली होती. याबाबत कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, ‘महापालिकेत एकहाती सत्ता असताना स्थायी समिती सभापती पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक का वाढते? आपले ४३ नगरसेवक असताना त्यांना सहलीला का पाठवावे लागते? राज्यात इतर ठिकाणी काही अडचण येत नाही. मग इथेच असे का? भाजपच्या नगरसेवकांनी याचे आत्मचिंतन करावे.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here