मुंबईः महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होतं आहे. तर, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार, राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होणार, अशी चर्चाही वारंवार होत असताना स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं भाजपवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्टँटअप कॉमेडियन चर्चेत आहे. शिवसेना नेते यांना शटअप या कुणाल या शोच्या दुसरे सिझनचे पाहुणे म्हणून आमंत्रित केल्यापासून कुणाल कामरा संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाला आहे. कुणाल कामरानं आता ट्विटरच्या माध्यमातून आणखी एक मागणी केली आहे.

‘संजय राऊत राष्ट्रपती होणार असतील तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्यास माझी काहीच हरकत नाही,’ असं खळबळजनक ट्विट कुणालं केलं आहे. या ट्विटमधून त्यानं अप्रत्यक्षरित्या भाजपला टोला हाणाला आहे.

कोण आहे कुणार कामरा

कुणाल कामरा एक स्टँटअप कॉमेडियन आहे. याशिवाय त्याचा शटअप या कुणाल हा पॉडकास्ट शो आहे. आत्तापर्यंत कुणालच्या या शोमध्ये अनेक मोठे राजकीय नेते सहभागी झाले आहेत. दरम्यान, संजय राऊत सरांनी शटअप या कुणालं या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरू करेन, अन्यथा शक्यता कमी आहे, असं ट्विट कुणाल कामरानं केलं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here