शरद पवार यांनी आज तुजळपापूरमध्ये जाऊन अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी केली. तिथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांना धीर दिला. त्यांच्या या पाहणी दौऱ्याचे फोटो कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत. त्यातील फोटोंमध्ये शरद पवारांच्या हाती कवड्याची माळ दिसत आहे. खुद्द अमोल कोल्हे यांनी ही गोष्ट निदर्शनास आणतानाच पवारांच्या हातातील माळेचं महत्त्वही सांगितलं आहे.
वाचा:
आपल्या ट्वीटमध्ये कोल्हे म्हणतात, ‘ही हातातील माळ खूप काही सांगते… हे प्रतीक आहे जिद्दीचं, विश्वासाचं, दिल्लीश्वराला आव्हानाचं, शून्यातून स्वराज्य निर्मिण्याचं, लोककल्याणाचं आणि रयतेच्या निर्व्याज प्रेमाचं!’
अर्थात, पवारांच्या हाती ही माळ कशी आली? ती त्यांनी जाणीवपूर्वक हातात ठेवली होती की मराठवाड्यातील दौऱ्यादरम्यान कुणी त्यांना ही माळ भेट दिली होती, याविषयी काहीही समजू शकलेलं नाही.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times