अहमदनगर: राज्यातील आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या आणि शिवसेनेतील वादाची धग कायम असतानाच आता नगर शहरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही वाद पेटला आहे. काँग्रेसच्या शहरजिल्हाध्यक्षाने राष्ट्रवादीच्या आमदाराला गुंड म्हटले तर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने काँग्रेसच्या शहराध्यक्षावर खंडणीचा आरोप केला आहे. आरोप करण्यामागे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचे भाचे यांची फूस असल्याचा आरोपही राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. ( in )

शहरातील एका व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या प्रकरणावरून या दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील जुना वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यातील हल्लेखोर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक असल्याचा आरोप करताना जगताप यांचा गुंड असा उल्लेख केला आहे. काळे यांनी जगताप समर्थकांकडून आपल्यालाही धमकावल्याचा आरोप करून पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपल्याविरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचले जात आहे. नियोजनबद्धरित्या बनाव निर्माण करत नगर शहरात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची घोडदौड रोखण्यासाठी ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याचे धमकावल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. वास्तविक पाहता लोकप्रतिनिधींनी समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी काम करायचे असते. मात्र, येथे आमदारच आपल्याविरुद्ध अशा केसेस करण्यास मदत करीत असल्याचा आरोपही काळे यांनी केला आहे. मात्र, आपण अशा गोष्टींना न घाबरता शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्या मार्गाने जाऊन अशा दहशतीचा सामना करणार असल्याचा पुनरुच्चारही काळे यांनी केला आहे.

वाचा:

काळे यांच्या आरोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित खोसे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काळे केवळ प्रसिद्धीसाठी जगताप यांच्यावर आरोप करीत आहेत. मात्र, आता ते जबाबदार पदावर आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा पराभव केला होता. काळे हे थोरात व तांबे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे जुन्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच थोरात व तांबे यांच्या सांगण्यावरूनच काळे हे जगताप यांच्यावर आरोप करीत आहेत. यासंबंधी आता आम्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत. तसेच कायदेशीर कारवाईही करणार आहोत, असेही खोसे यांनी म्हटले आहे.

वाचा:

यावरून आता आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढत जाऊन राज्यपातळीवरील नेत्यांकडे जाण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेले या दोन्ही पक्षांचे नेते यातून काय मार्ग काढतात, याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील मतभेदही असेच वरिष्ठ पातळीपर्यंत गेले होते. त्यातून तोडगा काढून मनोमिलन झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र या मतभेदांची धग अद्यापही कायम आहे. त्यातच आता दोन्ही काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे. आघातील तिन्ही पक्षांत हा वाद सुरू असताना नगरच्या महापालिकेत भाजपची सत्ता मात्र सुरळीत सुरू आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here