मुंबईः करोना संसर्गाच्या विळख्यात अडकलेल्या महाराष्ट्राला आता दिलासा मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे तसंच, मृत्यसंख्येतही घट होताना दिसत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

गेल्या सात महिन्यांपासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होती होती. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य प्रशासनानं कंबर कसली होती. प्रशासनाच्या प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे. आजही ९ हजार ०६० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १५० करोना रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. करोनाची ही आकडेवारीमुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळावा आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने करोनाची आजची आकडेवारी जारी केली असून नवीन बाधित रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यांच्यातील फरक वाढताच आहे. आज तब्बल ११ हजार २०४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळं राज्याचा रिकव्हरी रेटही ८५. ८६ टक्क्यावर पोहोचला आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २. ६४ टक्के इतका आहे. आत्तापर्यंत राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३ लाख ६९ हजार ८१० इतकी झाली आहे.

अॅक्टिव्ह रुग्ण

राज्य करोनामुक्त होण्याच्या दिशेनं एक एक पाऊल पुढं टाकत आहे. सध्या १ लाख ८२ हजार ९७३ अॅक्टिव्ह केस असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर, ८१ लाख ३९ हजार ४६६ चाचण्या घेतल्या असून त्यातून १५ लाख ९५ हजार ३८१ इतक्या चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या २४ लाख १२ हजार ९२१ जण होम क्वारंटाइन आहेत आणि २३ हजार ३८४ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here