मुंबई: उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. मुंबईतही तापमान १४.५ अंशांपर्यंत घसरले असून हा मुंबईत थंडीचा १० वर्षांमधील विक्रमी निचांक आहे. तर राज्यात नाशिकमधील निफाड येथे २.४ इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. ही राज्यातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद आहे. विशेष म्हणजे काल निफाडमध्ये ९.४ अंश सेल्सियस इतके तापमान होते. काही तासांमध्येच पारा तब्बल ७ अंशांनी घसरला आहे.

नाशिकमधील निफाडनंतर धुळ्यामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यामध्ये पारा ५ अंशाहून खाली घसरले आहे.

मुंबईत कुलाबा येथे १४.५ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली असून सांताक्रुझ येथे ११. ४ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.

हिवाळा सुरू झाल्यानंतर मुंबईत मुंबईत म्हणावी तशी नव्हती. मात्र गेल्या ४ दिवसांपासून मुंबईचे तापमान घसरण्यास सुरुवात झाली. काल पासून मात्र मुंबईचा पारा जलद गतीने घसरण्यास सुरूवात झाली. मुंबईत सुरू झालेली थंडी १७ जानेवारीपर्यंच तशीच राहीस असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान

मुंबई : १४.५
महाबळेश्वर : १०.८
औरंगाबाद : १५.५
ब्रह्मपुरी : १३.६
चंद्रपूर : १५.२
पुणे : १२.१
मालेगाव : १३.२
परभणी : १५.५
गोंदिया : १४.०
अहमदनगर : १३.६
नाशिक : ९.८
नांदेड : १२.०
नागपूर : १३.८
सांगली : १६.६
अकोला : १५.०
वाशिम : १५.८
जळगाव : १६
सातारा : १४.५
अमरावती : १५
वर्धा : १४.४

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here