नुकताच बिग बॉसच्या ‘विकेंड का वार’चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. ज्यात एजाज खानवर आरोप करण्यात आले आहेत. जॅस्मिननं एजाजवर घाबरवल्याचा आरोप केला आहे. टास्क दरम्यान एजाजनं जॅस्मिनच्या जवळ जाऊन तिला घाबरवलं, असा थेट आरोप तिनं केला.
जॅस्मिनच्या आरोपांनंतर एजाननं ही त्याची बाजू मांडली आहे. ‘यात चुकीचं असं काहीच नाही. मी टास्क जिंकण्यासाठी माझी युक्ती आणि सायकोलॉजिकल टॅक्टिक वापरली. एजाज आणि जॅस्मिनच्या या भांडणात कोणाची बाजू घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हिंदीचं हे सर्वात यशस्वी पर्व ठरणार असल्याचं खुद्द यानं म्हटलं आहे. नवीन स्पर्धकांसोबत काही जुने स्पर्धकही घरात दाखल झाल्यामुळं बिग बॉसच्या या पर्वाला सुरुवातीपासूनच तडका लागला आहे. हा या सीझनचा हा दुसराच ‘विकेंड का वार’ असून सलनाम नेमकी कोणाची शाळा घेणार आणि कोणाचं कौतुक करणार हे पाहायला मिळेल.
कोण होणार बेघर?
पहिल्या आठवड्यात सारा गुरपाल बेघर झाल्यानंतर आता बिग बॉसच्या घराला कोणता स्पर्धक रामराम ठोकणार हे समजणार आहे. बेघर होण्याच्या प्रक्रियेत रुबीना दिलैक, जैसमीन भसीन, अभिनव शुक्ला, जान कुमार आणि शहजाद देओल नॉमिनेटेड झाले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times