वृत्तसंस्था, मुंबई

गोपनीय पत्रव्यवहार थेट चॅनेलवरील कार्यक्रमात जगजाहीर करून औचित्यभंग करणाऱ्या नेटवर्क या वृत्तवाहिनीला ब्रॉडकास्ट ऑडिअन्स रिसर्च कौन्सिलने () फटकारले आहे. ‘टीआरपी घोटाळ्याबाबत संस्थेने कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. रिपब्लिक टीव्हीने पत्रातील आशय गैरपद्धतीने मांडला’, असा ठपका ‘बार्क’ने ठेवला आहे.

टीआरपी घोटाळा उजेडात आणून रेटिंग वाढवण्यासाठी गैरमार्ग अवलंबला जात असल्याचा निष्कर्ष चौकशीअंती मुंबई पोलिसांनी काढला आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ‘बार्क’ने सर्वच वृत्तवाहिन्यांचे आठवड्याचे टीआरपी जाहीर करण्यास स्थगिती दिली आहे. घोटाळ्यानंतरच्या एकंदरीत स्थितीविषयीच ‘बार्क’ने रिपब्लिक नेटवर्कशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, हा पत्रव्यवहार म्हणजे मुंबई पोलिसांच्या चौकशीतील निष्कर्षाशी ‘बार्क’ असहमत असल्याचा व त्याविरोधात ‘बार्क’ने रिपब्लिक टीव्हीची बाजू उचलून धरल्याचा निष्कर्ष रविवारच्या एका कार्यक्रमात काढण्यात आला. या पत्रव्यवहारातील मजकूरही जाहीर करण्यात आला. त्यामुळे गोपनीय पत्रव्यवहार उघडकीस आणून रिपब्लिक टीव्हीने औचित्यभंग केल्याचा ठपका ‘बार्क’ने ठेवला आहे व तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचा पवित्राही संस्थेने जाहीर केला आहे.

‘टीआरपीबाबत मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीबाबत बार्क इंडियाने कोणतेही भाष्य केलेले नाही. ‘बार्क’ संस्था तपास यंत्रणेला आवश्यक सर्व सहकार्य करीत आहे’, असे संस्थेने रविवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ‘खासगी व गोपनीय पत्रव्यवहार उघड करण्याच्या तसेच या पत्रातील मजकुराचा गैरअर्थ काढण्याच्या रिपब्लिक नेटवर्कच्या कृतीमुळे बार्क इंडिया नाराज झाले आहे’, असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच ‘मुंबई पोलिसांच्या टीआरपी विषयक चौकशीबाबत बार्क इंडियाने कोणतेही भाष्य केलेले नाही, हे आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो व संस्थेच्या अधिकारांचा कोणताही गैरवापर न करता बार्क इंडिया संस्था रिपब्लिक नेटवर्कच्या कृतीविषयी नाराजी व्यक्त करते’, असेही पत्रात म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here