कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांचे जावई आणि पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (एन) नेत्या मरियम यांचे पती सफदर अवन यांना पोलिसांनी अटक केली आहे. मरियम नवाझ आणि सफदर हे कराचीतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. पोलिसांनी दरवाजा तोडून सफदर यांना अटक केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्कराविरोधात विरोधी एकवटल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याआधी कराचीतीत झालेल्या जाहीर सभेत मरियम नवाझ यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली होती. आपल्या सरकारचे अपयश लपवण्यासाठी इम्रान खान लष्कराच्या मागे लपत असल्याचे मरियम यांनी म्हटले होते. स्वत:च्या चुका लपवण्यासाठी इम्रान खान हे लष्कराचा वापर करत आहेत. इम्रान खान हे भेकड असून पाकिस्तानी लष्कराला बदनाम करत असल्याची टीका मरियम यांनी केली.

वाचा:

वाचा:

पाकिस्तानमध्ये ११ प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘पाकिस्तान डेमोक्रेटिक मुव्हमेंट’ (पीडीएम) या नावाने एक संयुक्त मंच स्थापन केला आहे. पाकिस्तान सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आता एल्गार पुकारला आहे. शुक्रवारी पहिली सभा पार पडल्यानंतर दुसरी सभा कराचीत घेण्यात आली. यावेळी लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. पहिल्या सभेत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लंडनहून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभाग घेतला. पाकिस्तान लष्करप्रमुख बाजवा यांचे नाव घेऊन पाकिस्तानमध्ये दोन सरकार कोणी तयार केली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्करावर शरीफ यांनी सडकून टीका केली. तुम्ही मला देशद्रोही ठरवू शकता, माझी संपत्ती जप्त करू शकता, खोटे गुन्हे दाखल करू शकता. मात्र, नवाझ शरीफ लोकांसाठी कायम बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. खोटी प्रकरणे, गुन्ह्यासाठी आयएसआय प्रमुख फैज हामिद जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

वाचा:

वाचा:

नवाझ शरीफ शेपूट घालून पळाले: इम्रान खान
शुक्रवारी झालेल्या पीडीएमच्या पहिल्याच सभेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईपासून वाचण्यासाठी शरीफ हे शत्रूंच्या अजेंड्यावर काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नवाझ शेपूट घालून लंडनला पळाले असल्याची शेलकी टीका इम्रान खान यांनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here