मुंबई: यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत व शिवसेनेला घेरणाऱ्या भाजपवर आज जोरदार पलटवार करण्यात आला आहे. ‘इंदिरा गांधी यांच्या स्मृती कायमच्या मिटाव्यात असं ज्यांना वाटतं, त्यांनाच इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाची काळजी वाटावी हे आश्चर्य आहे. भाजपमध्ये घुसलेल्या इरसाल बाटग्यांची ही उठाठेव आहे,’ अशी जहरी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

इंदिरा गांधी व करीम लाला यांच्या भेटीबद्दल संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. भाजपनं या संधीचा फायदा उठवून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसनं या वक्तव्याची गांभीर्यानं दखल घ्यावी, असं भाजप नेत्यांनी सुचवलं आहे. इंदिरा गांधी यांच्याबद्दल भाजप दाखवत असलेल्या या आपुलकीमुळं शिवसेनेत अस्वस्थता आहे. त्याच अनुषंगानं ‘सामना’तून भाजपवर तोफ डागण्यात आली आहे.

वाचा:

अग्रलेखाची ठळक वैशिष्ट्ये:

>> पंतप्रधान मोदी यांना ‘पेढेवाले’ वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजूनं भाजप उभा ठाकला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो, पण इंदिरा गांधीही प्रिय झाल्या याचा सगळ्यात जास्त आनंद आहे.

>> इंदिराजींचे व्यक्तिमत्त्व महान होते. त्यास तडे देण्याचे प्रकार मधल्या काळात सरकारकडून झाले. आज भाजपला वाटते इंदिराजींचा अपमान झाला. त्यांना असं ‘वाटणं’ हाच इंदिराजींचा सन्मान आहे.

>> भाजपला सध्या काही काम नसल्यानं ते अनेक विषयांचं उत्खनन करू लागले आहेत. भाजपमध्ये घुसलेल्या काही इरसाल बाटग्यांनी हे प्रकार सुरू केले आहेत. हे काही चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही.

वाचा:

>> मुसाफिरखान्यातील कार्यालयात करीम लालाचे जगभरातील नेत्यांसोबतचे फोटो होते. आज ते कार्यालय व दिवाणखाना नाही. त्यातील तसबिरी आजच्या भाजपवाल्यांनी पाहिल्या असत्या तर त्यांच्या डोळ्यांची बुबुळेच बाहेर पडली असती.

>> सत्ता हातून सटकल्यानं निद्रानाशाचा रोग जडला हे समजू शकतो, पण त्यामुळं जे झटके येत आहेत त्यातून महाराष्ट्राच्या इभ्रतीस तडे जात आहेत.

वाचा:

>> इतका बेजबाबदार विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या इतिहासात निर्माण झाला नसेल, पण आधी अक्कल जाते व मग उरलेसुरले भांडवल जाते असं काहीसं सुरू आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here