मुंबईः राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला असून पूरस्थितीमुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आशातच आर्थिक मदतीवरून राज्यात राजकारणही तापलं असून विरोधी पक्षाकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे. यावर युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी यांच्यावर निशाणा साधला आहे.

पूरस्थितीमुळं नुकसानग्रस्त नागरिकांच्या भेटीसाठी राजकीय नेत्यांनी दौरे सुरू केले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेत्यांसोबतच विरोधी पक्षातील नेतेही परिस्थितीची पाहणी करण्यास उतरले आहेत. देवेंद्र फडणवीसही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करत आहेत. यावरूनच सत्यजित तांबे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ट्विटरवर काही नेत्यांचे फोटो ट्विट करत त्यांनी फरक, जमिनीचा व हवेचा, असं खोचक ट्विट केलं आहे.

सत्यजित तांबे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देवेंद्र फडणवीस यांचा गत वर्षी आलेल्या पूराची हॅलिकॉप्टरमधून पाहणी करतानाचा फोटो आणि आता मुख्यमंत्री आणि शरद पवार यांचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतल्याचा फोटो, असे तीन फोटो ट्विट केले आहेत. या फोटोला त्यांनी फरक जमिनीचा व हवेचा, असं कॅप्शन दिलं आहे. तर, आणखी एका ट्विटमध्ये माणूस सत्तेवर असताना जमिनीवर पाहिजे, सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात, असं ट्विट केलं आहे.

भेट

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here