अबुधाबी, : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या फलंदजांना यावेळी चांगला सूर गवसल्याचे पाहायला मिळाले नाही. याला फक्त अपवाद ठरला तो अष्टपैलू रवींद्र जडेजा. या सामन्यात जडेजाने अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. त्यामुळेच चेन्नईला या सामन्यात राजस्थानपुढे १२६ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. जडेजाने यावेळी चार चौकारांच्या जोरावर नाबाद ३५ धावांची खेळी साकारली

चेन्नईने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या सामन्यात चेन्नईला चांगली सुरुवात नाही मिळाली. कारण फॅफ ड्यू प्लेसिस आणि शेन वॉटसन हे फॉर्मात असलेले फलंदाज यावेळी लवकर बाद झाले. पण सॅम करनने यावेळी थोडी चांगली फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. सॅमने यावेळी २२ धावा केल्या.

सॅम बाद झाल्यावर अंबाती रायुडूही जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. रायुडूला यावेळी जीवदान मिळाले होते. नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर श्रेयसने पायचीतची अपील केली. त्यावेळी अंबाती रायुडू हा फलंदाजी करत होता आणि रायुडूच्या पॅडला चेंडू लागला होता. त्यावेळी पंचांनी रायुडूला आऊट दिले होते. पण धोनीने यावेळी रायुडूला डीआरएस घ्यायला सांगितले आणि त्याला जीवदान मिळाले होते. पण या जीवदानाचा फायदा रायुडूला उचलता आला नाही. रायुडू यावेळी १३ धावांवर बाद झाला.

रायुडू बाद झाल्यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यामध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली. या दोघांनी संघाचे शतक फलकावर झळकावले. पण धोनी यावेळी दुर्देवीपणे धावचीत झाल्याचे पाहायला मिळाले. धोनीने यावेळी दोन चौकारांच्या जोरावर २८ धावा केल्या. पण जडेजाने यावेळी अखेरच्या षटकांमध्ये जलदगतीने धावा जमवल्या. त्यामुळेच चेन्नईच्या संघाला यावेळी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आल्याचे पाहायला मिळाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here