वाचा:
राज्य करोना संसर्गाच्या संकटातून हळूहळू सावरत आहे. राज्यातील करोनाची लाट ओसरताना दिसत आहे. आजच्या आकडेवारीतून त्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. विशेष म्हणजे सर्वच बाबतीत स्थिती सुधारताना दिसत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यूंचा आकडा सवाशेपर्यंत खाली आला आहे. राज्यात आज १२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यात सर्वाधिक ४३ मृत्यू पालिका हद्दीत झाले तर पुणे शहरात ८ मृत्यूंची नोंद झाली.
वाचा:
आज १५ हजार ६९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले असून आतापर्यंत एकूण १३ लाख ८४ हजार ८७९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता (Recovery Rate) ८६.४८ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ८१ लाख ८५ हजार ७७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख १ हजार ३६५ (१९.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख १४ हजार ५७७ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २३ हजार २८५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
राज्यात सध्या १ लाख ७३ हजार ७५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात मुंबईनंतर करोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता ४० हजारच्या खाली आला आहे तर मुंबईतही स्थिती बरीच नियंत्रणात आली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या ३८ हजार ३३५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबईत १९ हजार ९०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा २८ हजार ७२४ इतका आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times