नवी दिल्लीः करोना व्हायरसच्या संकटाने नागरिकत्व सुधारणा कायद्याची (CAA) अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. हा कायदा लवकरच लागू केला जाईल, असं जे. पी. नड्डा म्हणाले. यासह जे. पी. नड्डा ( jp nadda ) यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवरही हल्ला केला.

जे. पी. नड्डा यांची उत्तर बंगालच्या एका सोशल ग्रुपसोबत बैठक झाली. या बैठकीत नड्डा यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला. आपल्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या राजकीय स्वार्थासाठी ‘फोडा आणि राज्य करा’ असं राजकारण करत असल्याचा आरोप नड्डांनी केला. पण भाजप सर्वांगीन विकासासाठी काम करते, असं नड्डा म्हणाले.

तुम्हाला सर्वांना नागरिकत्व सुधारणा कायद्याचा लाभ मिळेल. ते संसदेत मंजूर झाले आहे. यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. करोना व्हायरसच्या संसर्गामुळे सीएएची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. पण परिस्थिती सुधारणा होत आहे तसं काम सुरू झालं आहे आणि आता नियम बनवले जात आहेत. सीएएची लवकरच अंमलबजावणी केली आणलं जाईल, असं नड्डा यांनी स्पष्ट केलं.

सीएए म्हणजे काय?

नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA) अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मातील परप्रांतीयांना नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शनेही झाली. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्येही विरोध केला गेला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here