वाचा:
जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तथापि, आरोग्य सूत्रांच्या सूचनेनुसार दुसऱ्या करोना लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज केली जात आहे. यासाठी जिल्हाभरातील आरोग्य, महसूल व अनुषंगिक यंत्रणेशी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट संवाद साधला. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान तसेच ‘माझे क्षेत्र, माझा पुढाकार’ या योजनांमध्ये सर्व यंत्रणेने झोकून देऊन काम करावे, असे निर्देशही ठाकरे यांनी दिले.
वाचा:
करोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू
करोनामुळे नागपूर शहर पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अभिजीत गिरी (वय ३५ रा. काळमेघनगर), असे मृतकाचे नाव आहे. अभिजित हे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तैनात होते. काही दिवसांपूर्वी अभिजित यांना करोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यांना पोलीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी पहाटे छातीत वेदना होत असल्याचे त्यांनी येथील डॉक्टरांना सांगितले. पोलीस रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना लगेच खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांना हदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. पाच वर्षांपूर्वी अभिजीत यांचा अपघात झाला होता. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती, अशी माहिती आहे. अभिजीत यांच्या मागे पत्नी रेश्मा, दोन अपत्ये, आई-वडील असा परिवार आहे. करोनामुळे आतापर्यंत १६ पोलिसांचा मृत्यू झाला. १६०० कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाली असून, यात पोलिसांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times